सोन्याचा धूर निघणाऱ्या सोलापुराच्या वैभवाची ओळख पुसली, वारसाप्रेमीं आणि गिरणी कामगारा मधून नाराजी

सोलापूर : प्रतिनिधी
ब्रिटिश काळात सोलापूरची ओळख गिरणगाव अशी होती. कापड गिरण्या हे इथले वैभव होते. याची निशाणी ही लक्ष्मी विष्णू मिलची चिमणी होती. तीदेखील गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. वारसाप्रेमी आणि गिरणी कामगारा मधून याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
१८९६ मध्ये सुरू झालेल्या लक्ष्मी विष्णू मिलची ही चिमणी अतिशय भक्कम स्वरूपात उभी होती. ब्रिटिशकालीन बांधकाम असल्याने आणखी शंभर वर्षे तरी ही चिमणी पडली नसती, असे असताना एक ऐतिहासिक वारसा पुसला गेल्याने वारसाप्रेमीं गिरणी कामगारा मधून नाराजी व्यक्त होत आहे.
ज्या लक्ष्मी-विष्णू मिलमुळे आमचा संसार सुरू झाला व वाढला. त्यापैकी लक्ष्मी मिलची शेवटची आठवण देखील नाहीशी झाली. डोळ्यासमोर एक इतिहास व त्याची शेवटची खूण नाहीशी झाली. ज्या मिलमुळे काबाडकष्ट करून समाजात सन्मानाचे स्थान मिळवण्यासाठी मदत झाली. जगण्याचा आधार दिला. तिची शेवटची खूण देखील आज पुसून टाकण्यात आली. त्यामुळे खूप वाईट वाटत आहे. सोलापूरची गिरणगाव म्हणून असलेली ओळख आज खन्ऱ्या अथनि पुसली गेली. यापुढे सोलापुरात कधीच कापड गिरणीच्या खुणा दिसणार नाहीत. केवळ आठवर्णीवर दिवस काढावे लागतील अशी भावना अनेक मिल कामगारांनी व्यक्त केली.