पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे चातुर्य, पोलिस भरती उमेदवारांची जिंकली मने, सर्वत्र होतेय कौतुक..

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीण पोलीस घटकात १९ जून २०२४ पासुन पोलीस शिपाई/चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२३ ची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण २५५ उमेदवारांनी पोलीस भरतीमध्ये भाग घेतला. सर्व उमेदवारांची गोळा फेक चाचणी पूर्ण झाली आहे. ४९ उमेदवांराची १०० मिटर धावणे चाचणी पुर्ण झाली आहे.
दरम्यान पावसामुळे मैदान, चाचणी योग्य नसल्याने उर्वरित उमेदवारांची चाचणी पुर्ण होऊ शकली नाही. १०० मिटर व १६०० मिटरची रनिंग चे मैदान पावसामुळे खराब होऊ नये यासाठी संपूर्ण रनिंगच्या मैदानावर प्लास्टिक हातरले असून पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पोलीस भरती होण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. पाऊस पडल्यानंतर रनिंग चा ट्रॅक चीखलमय होतो त्यावेळेस आपल्याला कमी मार्क पडणार परंतु शिरीष सरदेशपांडे यांच्या चातुर्याने सर्वांची मने जिंकली.
ज्या उमेदवारांची १०० मिटर व १६०० मिटर ची चाचणी बाकी आहे, त्यांनी दिनांक २८ जून २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता, कवायत मैदान पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे हजर रहावे. ज्या उमेदवारांची २८ जून २०२४ रोजी इतर घटकात भरती आहे त्यांनी त्या दिवशी संबधित घटकात भरती मध्ये भाग घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र घेऊनच २९ जून २०२४ रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय, कवायत मैदानावर सकाळी ६.०० वाजता हजर रहावे.
असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले. आहे.