माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची घेतली भेट, भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
या भेटीत सोलापूर, माढा लोकसभा निवडणुकी संदर्भात कोणती चर्चा झाली हे गुलदस्त्यात, मात्र या भेटीने राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे टेन्शन मात्र वाढले.

सोलापूर : प्रतिनिधी
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतली. अनगर येथील राजन पाटील यांच्या निवासस्थानी विजयसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली परंतु या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आला आहे. पुतण्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचं बोललं जातंय माढा लोकसभा मतदारसंघ सोबत ते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या पुन्हा गाठीभेटी घेत आहेत.
खरंतर माजी आमदार राजन पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेले आहेत. त्यामुळे राजन पाटील यांच्या भेटीवर राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांनी बीड चे पार्सल बीडला परत पाठवू अशी घोषणा अकलूज मध्ये केली होती. राजन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात सोलापूर, माढा लोकसभा संदर्भात कोणती चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आले नसले तरी दोन्ही लोकसभा मतदारसंघात मात्र चर्चेला उधाण आले आहे.