
सोलापूर : प्रतिनिधी
अत्त दीप भव: सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित द ग्रेटेस्ट इंडियन डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डफरीन चौक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक जय गायकवाड, उत्सव अध्यक्ष सुशील शिवशरण यांनी नेटके नियोजन केले होते.
यावेळी शिवसेनेचे शहर समन्वयक दिलीप कोल्हे, मध्यवर्ती डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती विश्वस्त विजय पोटफोडे, राजाभाऊ कदम, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे, भाजप शहर चिटणीस शेखर फंड, उद्योजक दत्तात्रय पवार, दत्तात्रय शिंदे, तात्या चौगुले, अजित चव्हाण, धनाजी सुरवसे, शहाजी अवताडे, विशेष अतिथीती डॉ SM दामा उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली तदनंतर मान्यवरांचा सत्कार संस्थेचे संस्थापक जय गायकवाड, उत्सव अध्यक्ष सुशील शिवशरण आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यम गायकवाड, मार्गदर्शक PD सोनकांबळे, रूपसेन गायकवाड, यशराज गायकवाड, शुभम गायकवाड, प्रवीण शिवशरण, आतिश कांबळे, अविनाश शिखरे, आनंद साखरे, आणि संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.