
सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरत चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर शहर युवक समन्वयक पदी महेश कुलकर्णी यांची निवड केली आहे. कुलकर्णी यांना शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले. या प्रसंगी युवक शहराध्यक्ष सुहास कदम, महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम, समन्वयक शशिकला कस्पटे,सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते.