
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ निराळे वस्ती भागात माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या नेतृत्वात कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, माजी महापौर महेश कोठे, माजी उपमहापौर नानासाहेब काळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक हरिदास गायकवाड, माजी नगरसेविका रेखाताई सपाटे, राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्ष सुनिता रोटे, सभेचे आयोजक क्रांती तालीमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना मताधिक्य देत भाजपाला हद्दपार करू. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केले.
यावेळी दत्ताभाऊ शिंदे, सावदा सावंत, शिवाजी भोसले, सचिन भोसले, क्रांती तालीम मंडळाचे सदस्य आणि युवक महिलांची प्रचंड गर्दी होती.