चला मतदान करू या.. किल्ल्यावर बच्चे कंपनी कडून मतदान जानगृती

सोलापूर : प्रतिनिधी
चला मतदान करू या, मतदानाचा हक्क बजावा, भारतीय लोकशाही बळकट करण्याचा संदेश सिंहगड बच्चे कंपनीने तयार केलेल्या किल्ल्यावर लिहण्यात आला आहे. त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आदेश गोडसे व त्यांच्या मित्रांनी दरवर्षी प्रमाणे यंदा ही किल्ले सिंहगड ची प्रतिकृती करून अभिनव संदेश दिला आहे.
आदेश गोडसे व त्याच्या मित्रांनी जुळे सोलापूर परिसरातील संतोष नगर येथे सालाबाद प्रमाणे ह्यावर्षी सिंहगड किल्याची हुबेहुब प्रतिकृती तयार केली आहे. तसेच ह्या वेळेस विधान सभेची निवडणूक असल्याने चला मतदान करुया उज्वल भविष्य घडवूया. मतदान हा आपला अधिकार आहे, आपले मत वाया जाऊ देऊ नका, मतदानाचा हक्क मतदानाच्या दिवशी नक्की बजावा. असा संदेश पण या निमीत्ताने दिला आहे.
सदरचा किल्ला पाहण्यास जुळे सोलापूर येथील खुप जण येत आहेत व आदेशचे व त्याच्या मित्राचे कौतुक करत आहेत. सदर किल्ला करण्यास आखिल बिराजदार पाटील, आकाश बिराजदार पाटील, मल्लीकार्जुन पटने, श्रीतेज देशपांडे, श्री बिज्जरगी, विरेश सुतार, लक्ष्मी पटणे, श्रावणी बिज्जरगी यांनी मदत केली आहे.