
सोलापूर : प्रतिनिधी
धर्म रक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती शंभुराजे यांच्या 367 व्या जयंतीनिमित्त छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शंभुराजे यांच्या सिंहासनारूढ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, पत्रा तालीम प्रमुख श्रीकांत घाडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, यांच्या शुभहस्ते छत्रपती शंभुराजे यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शंभू महाराज की जय, जय भवानी जय शिवराय, अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज परिसर दणाणून गेला.
छात्रवीर प्रतिष्ठानच्या आदर्शवत उपक्रमाचे विशेष कौतुक करत. वायपट खर्चाला फाटा देत प्रत्येक मंडळांनी डॉल्बीमुक्त जयंती साजरी करून तसेच पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देऊन मर्दानी खेळांचे उत्कृष्ट सादरीकरण करत छत्रपती शंभुराजे जयंती उत्साहात साजरी करावी असे आवाहन जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत व ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी केल.
छात्रवीर प्रतिष्ठान मंडळाचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे, संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे, युवा नेते वैभव गंगणे, शिवा भोसले, नागेश घोरपडे, अजय मस्के, श्रेयस माने, शितल जगदाळे, करिष्मा लालबेगी, ऋतुजा पवार, सुनीता माने, समृद्धी चव्हाण, यांच्यासह तमाम शंभू प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.