मातृदिना निमित्ताने मनोरमा सखी मंच अध्यक्ष शोभाताई मोरे यांचे मनोरमा परिवाराच्या वतीने सत्कार
मनोरमा बँकेच्या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला

सोलापूर : प्रतिनिधी
मनोरमा बँक तसेच मनोरमा मल्टीस्टेट व सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा बँक मुख्य कार्यालय येथे कर्मचारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, प्रमुख पाहुणे मनोरमा सखी मंच अध्यक्ष शोभा मोरे आणि सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांची उपस्थिती होती.
मनोरमा बँकेच्या कर्मचारी कार्यशाळेत एकूण शंभर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चीफ ऑफिसर नवनाथ बिराजदार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम – १९६०, बँकिंग विनिमय कायदा १९४९ च्या अनुषंगाने वसुली बाबत मार्गदर्शन केले व त्याबाबत सखोल माहिती सांगितली.
कार्यक्रम प्रसंगी मातृ दिनाच्या निमित्ताने मनोरमा सखी मंच अध्यक्ष शोभा मोरे यांचे मनोरमा परिवाराच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी मनोरमा बँकेचे संचालक दत्तामामा मुळे, सुहास भोसले, गजेंद्र साळुंखे, शुभांगी भोसले, गणपत कदम, डॉ. सुमित मोरे, डॉ. ऋचा मोरे पाटील, मनोरमा बँकेचे मॅनेजर नीलकंठ करंडे, असिस्टंट मॅनेजर कमलाकर पुजारी, पुरुषोत्तम साखरे, मनोरमा मल्टीस्टेट चे डेप्युटी सीईओ अरुंधती नायडू, नंदकुमार भोसले उपस्थित होते. स्वागत बँकेच्या सीईओ शिल्पा कुलकर्णी, प्रास्ताविक बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड, आभार व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे आणि सूत्रसंचालन अजय मोरे यांनी केले.