44 वर्षे अखंड मराठा समाजासाठी लढणाऱ्या लढवय्यांचा जरांगे पाटील यांनी केला सन्मान, शेळके, रसाळे यांचा आदर्श आजच्या युवकांनी घ्यावा : मनोज जरांगे पाटील

सोलापूर : प्रतिनिधी
1980 साली अण्णासाहेब पाटील यांनी पुणे येथे मराठा महासंघाची स्थापना करण्यासाठी पहिली बैठक आयोजित केली. या बैठकीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रमुख युवकांना बैठकीस बोलवले. यावेळी सोलापुरातून प्रमुख युवक पुणे येथे बैठकीसाठी गेले त्यामध्ये दास शेळके, सुनिल रसाळे, कै सुभाष जगताप, हे उपस्थित होते.
यावेळी मराठा महासंघाची स्थापना होऊन मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरून काम करण्याचे धोरण ठरवण्यात आले. अण्णासाहेब पाटील यांनी 1980 साली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक मराठा युवकांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चे काढण्याचे आदेश दिले.
या आदेशाचे पालन करत मराठा समाजाचे दास शेळके आणि सुनिल रसाळे यांनी सोलापुरात मराठा आरक्षणाचा पहिला मोर्चा काढला. त्यावेळी प्रतिकुल परिस्थितीत संघटनेचे काम केले वेळ प्रसंगी सायकल वर फिरून शाखा सुरू केल्या मराठा समाजासाठी विविध आंदोलने केली त्यामुळे त्यांच्यावर 19 पोलिस केस झाल्या.
1980 सालापासून ते आज 2024 सालापर्यंत म्हणजे 44 वर्ष अखंड, अविरत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विविध प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून काम करण्याची भूमिका दास शेळके आणि सुनील रसाळे आजही घेत आहेत. याची दखल घेत बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी विधानसभेत दोन्ही मराठा बांधवांची माहिती देत मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती.
दास शेळके आणि सुनील रसाळे आजही युवकांना लाजवेल अशा पद्धतीने मराठा समाजासाठी काम करत आहेत. सात ऑगस्ट रोजी सोलापूर शहरात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि भव्य सभेचे आयोजन मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीने करण्यात आलं होतं यामध्ये समन्वय समितीमध्ये उत्तमरीत्या कामगिरी बजावली.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनात सोलापूर शहर जिल्ह्यात त्यांनी भाग घेतला. याची दखल घेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दास शेळके आणि महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनिल रसाळे यांचा सत्कार केला.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे जेष्ठ समन्वयक दिलीप कोल्हे, अमोल शिंदे, अनंत जाधव, रवी मोहिते, संजय शिंदे, उद्योजक प्रदिप साठे, शशी थोरात, योगेश पवार, शेखर फंड, दिनेश जाधव, महेश सावंत, यशवंत रसाळे, शिरीष जगदाळे, यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.