स्विमिंग टँकमध्ये बुडून मृत्यू प्रकरण कारवाई गुलदस्त्यात, पोलिस का पालिका आधिकरी कोण करणार कारवाई.?

सोलापूर : प्रतिनिधी
महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या परंतु सध्या ए के ग्रुप ग्रीफेंन्स या खासगी कंपनीला चालविण्यासाठी दिलेल्या पार्क येथील सावरकर स्विमिंग टँकमध्ये बुडून युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रवीण शिवानंद बहिरमठ, वय २२ रा. भवानी पेठ, रूपा भवानी मंदिरा जवळ सोलापूर असे या युवकाचे नाव आहे.
प्रविणने टँक मध्ये पोहण्याचा सराव करण्या करिता बॅच लावली होती. नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी तो पोहण्याकरता आला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडला. नागरिकांनी त्यास बेशुध्द अवस्थेतून बाहेर काढले उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तो उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्रवीण च्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले, सोलापूर शहरातील पोहण्यास शिकणाऱ्या मुला मुलीं करिता, स्विमिंग क्षेत्रात खेळाडू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आणि गिरणी कामगार, कष्टकरी यांच्या मुलांसाठी अल्प दरात हे स्विमिंग टॅंक उपलब्ध असायचे. परंतु खाजगी कंपनीला चालवण्यास हा स्विमिंग टॅंक दिल्याने मुळ उद्देशच नष्ट झाला. ए के ग्रुप ग्रीफेंन्स या कंपनीला जे अटी नियम घालून महापालिका जलतरण तलाव उपलब्ध करून दिले ते अटी नियम पाळतात का हे कोण पाहणार..?
प्रवीण चा मृत्यू झाला त्या समयी जलतरण तलाव मधील नेमणूक केलेले कर्मचारी कोठे होते.? जीव रक्षक, पोहण्यास शिकवणारे शिक्षक हे काय करत होते.? ए के ग्रुप ग्रीफेंन्स कंपनीचे नेमलेले अधिकारी कोठे होते.? प्रवीणच्या मृत्यू प्रकरणात कोण दोषी.? या सर्व प्रकरणात पोलीस कारवाई करणार का, महापालिका कारवाई करणार.? असे अनेक प्रश्न सोलापूर शहरवासीयांच्या समोर उभे आहेत. जलतरण तलावात आपल्या मुला मुलींना पोहण्यास घेऊन येणारे अनेक पालक भयभीत झाले आहेत. प्रवीणच्या मृत्यू प्रकरणात पुढे काय होणार वाचा मराठा व्हिजन न्यूज..