नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत श्रावणी सोनवणेची निवड

सोलापूर : प्रतिनिधी
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक मान्यता प्राप्त इंडिया तायक्वांडो यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे भव्य राज्यस्तरीय तायकांडो स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेपूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा घेऊन त्यातून विजेते निवडण्यात आले.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ सोलापूर ज्युनियर क्युरोगी, पूमसे आणि सीनियर पूमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप 5 जून 2024 रोजी महात्मा गांधी भवन मंद्रूप येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. द वाॅरिर्यस तायक्वांदो अकॅडमी ची खेळाडू कु.श्रावणी प्रकाश सोनवणे हिने 55 ते 58 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले.
10 आणि 11 जून रोजी-नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा साठी कु.श्रावणी सोनवणे हिची निवड झाली आहे. मुख्य प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे व जालिंदर साळवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तुझ्या पुढील वाटचालीस सोलापूर शहरवासीयांनी शुभेच्छा दिल्या.