विधानसभेला शहर उत्तर काँग्रेस पक्षाकडे ठेवा, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कडे मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर उत्तर मतदार संघातून २००९ साली काँग्रेस पक्षाचा पराभव फक्त दहा हजार मतांनी झाला होता. त्यावेळेस राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांनी बंडखोर केल्यामुळे काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला. त्यानी नसते तर काँग्रेस उमेदवार निवडून आला असता.
मित्र पक्ष म्हणून तडजोड अंती २०१४ आणि २०१९ साली राष्ट्रवादीला हा मतदार संघ देण्यात आला. अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादीचे डिपॉझिट जप्त झाले. अशा अनेक कारणांमुळे शहर उत्तर मधील काँग्रेस चा अस्तित्व धोक्यात आले. २०१४ च्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा एक ही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे पक्षाचे अस्तित्व शहराच्या कानाकोपऱ्यात असणे आवश्यक आहे. प्रणिती शिंदे यांच्या निवडीने मतदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचा वातावरण निर्माण झाला आहे. याचा फायदा शहर उत्तर मध्ये काँग्रेसला मिळू शकतो आणि पुन्हा शहर उत्तर मध्ये काँग्रेसमय वातावरण होऊन काँग्रेसला फायदा होऊ शकतो. त्याचा फायदा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. सोलापूर शहर उत्तर विधान मतदार संघ हा मित्र पक्षाला न देता काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडावा. अशी मागणी शहर उत्तरं विधानसभेतील काँग्रेस पदाधिकारी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे.
या प्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, हेमा चिंचोळकर, अशोक कलशेट्टी, संजय शिंदे, सुशील बंदपट्टे, चक्रपाणि गजम, राज सलगर, पशुपती माशाळ, शिवकुमार कोळी, उपस्थित होते.