सोलापूरमहाराष्ट्रराजकीय
पाचव्या फेरीत राम सातपुते ६ हजार ३१४ मतांनी पुढे, प्रणिती शिंदे पिछाडीवर

सोलापूर : प्रतिनिधी
‘ईव्हीएम’मधील मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत पाच फेऱ्यांची मोजणी पूर्ण झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना एकूण एक लाख ४२ हजार ७०० मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना एक लाख ३६ हजार ३८६ मते पडली आहेत. पहिल्या फेरीत ‘नोटा’ला १८१ तर दुसऱ्या फेरीत ‘नोटा’ला २६८ मते पडली आहेत. पाचव्या फेरीअखेर आमदार सातपुते ६ हजार ३१४ मतांनी पुढे आहेत.