राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन निमित्त इको नेचर क्लबने केले वृक्षारोपण

सोलापूर : प्रतिनिधी
इको नेचर क्लबच्या माध्यमातून प्रदूषण मुक्त करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस या दिवसाचं निमित्त साधून सैफुल परिसरातील रस्त्यामधील दुभाजकामध्ये मध्ये वातानुकूलित व प्रदूषण मुक्त करणारे रोप तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडणारे असे फुलांचे व कार्बन शोषित करणारे वृक्ष तसेच जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष लावण्याचा एक प्रयत्न.
आज रोपांचा वृक्षारोपण करण्यास सुरुवात करून महिन्याभरात या दुभाजकांमध्ये शेंकडों रोपे लावण्यात येणार आहे व त्याचे काळजीही घेतली जाणार आहे आठवडा पूर्वी या दुभाजकातील सोलापूर महानगरपालिकांच्या स्वच्छता दूत व स्वयंसेवी पर्यावरण मित्र यांच्या कडून स्वच्छता करण्यात आली त्यानंतर आज वृक्षारोपण करण्यात आले.
विशेष म्हणजे आज इको नेचर क्लबच्या सदस्या तृतीयपंथी राणी वाघमारे यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले व पर्यावरणाचा संदेश ही देण्यात आले. रस्त्यावरील येणारे जाणारे वाहतूक करणाऱ्या नागरिकांनाही प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी त्यांना प्रबोधनही करण्यात आले. उपस्थितीत पत्रकार समितीचे अध्यक्ष राम हुंडारे, रविकांत रणदिवे, ब्रह्मा माशाळकर, हैदर कुरेशी, साहिल आडते, इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक व पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर आदी उपस्थिती त वृक्षारोपण करण्यात आले व राष्ट्रीय नियंत्रण प्रदूषण दिनानिमित्त संदेश देण्यात आला.