हुल्लडबाजी पोलिसांनी दिला चोप, रात्री विजापूर वेस येथील घटना

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाने टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघाच्या या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. फटाके फोडले जात आहेत, घोषणा दिल्या जात आहेत.
सोलापुरात देखील रात्री अनेक युवक घराबाहेर पडून जल्लोष करत होते छत्रपती शिवाजी महाराज चौक, विजापूर वेस, सात रस्ता, आसरा, विजापूर रोड येथील ITI चौक, बाळे यासह विविध चौकात युवकांनी एकत्र येत घोषणा देत फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला.
विश्वचषक जिंकला सर्वत्र आनंद जल्लोष व्यक्त करत असताना काही युवक मात्र टू व्हीलर वरून आरडाओरडा करत घोषणा करत वाहन वेड्या वाकड्या पद्धतीने चालवत हुल्लडबाजी करताना पाहावयास मिळाले. विश्वचषक जिंकला याचा आनंद जल्लोष सर्वांनी साजरा करावा परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता ही घेतली पाहिजे. रात्रीच्या वेळी विजापूर वेस येथे काही टू व्हीलर वरून युवक हुल्लडबाजी करत घोषणा देत जात होते. त्यावेळेस त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी केला.
परंतु युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी दोन-चार युवकांना काठीचा प्रसाद देत चोप दिला, चोप पडतात युवकांची पळापळ सुरू झाली आणि सर्वत्र शांतता पसरली.