पाच आमदारांच्या पोस्टरला मारले जोडे, मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखू, कोणी आणि का दिला इशारा.?

सोलापूर : प्रतिनिधी
1950 साला पूर्वीचे पुरावे असताना देखील जातीचे दाखले मिळत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत कोळी समाज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्या बैठकीच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळणार होता मात्र काही आदिवासी आमदारांनी त्या बैठकीला विरोध केला आणि ती बैठक रद्द केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आमदारांच्या पोस्टला जोडे मार आंदोलन करण्यात आले.
तसेच जातीच्या दाखल्यांचे वाटप न झाल्यास मुख्यमंत्र्यांना आषाढी च्या महापुजेपासून रोखू असा इशारा यावेळी देण्यात आलाय. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे झालेल्या आंदोलनात आ.मंजुळा गावीत, आ.किरण लहामटे, आ.आमशा पाडवी, आ.हिरामण खोसकर, आ.सुनील भुसारा यांच्या पोस्टर ला जोडे मार करत कोळी समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
या आमदारांच्या विरोधात प्रचार करून यांना विधानसभा निवडणुकीला पाडू असा इशारा देखील यावेळी महर्षी वाल्मिकी संघ राज्य अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला.