तुफान गर्दी.. हिंगोलीत मराठा आरक्षण जनजागृती रॅली, मनोज जरांगे पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला 13 जुलै पर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे. मराठा आरक्षणाची जनजागृती व्हावी यासाठी आज हिंगोली येथे मराठा आरक्षण जनजागृती रॅली करण्यात आली. या रॅलीस मराठा समाज बांधवांसह 18 पगड जातीतील नागरिकांनी सहभाग नोंदवत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला.
पहा हिंगोलीतील मराठ्यांचे वादळ.
जनजागृती रॅलीस हिंगोलीतील नागरिकांनी नोंदवलेला प्रतिसाद हा उत्स्फूर्त होता रेकॉर्ड ब्रेक रॅली निघाल्याने प्रशासनासह सरकारचेही लक्ष वेधून घेतले. सदरची गर्दी गरजवंत मराठ्यांच्या ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी जमलेली हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांची आहे. सरकारकडे अजून ही 13 जुलै पर्यंतची वेळ आहे आता फसवणूक केली तर सरकारला सुट्टी नाही असे म्हणत मराठा बांधव रॅलीवेळी आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले.