बाप रे.. सोरेगाव भाटेवाडी परिसरात दिसला बिबट्या, निव्वळ अफवा.. बिबट्या दिसल्यास 1926 वर करा कॉल

सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील सोरेगाव व केगाव परिसरात बिबट्या असल्याचा व्हिडिओ वायरल झाला. छत्रपती संभाजीनंगर, नाशिकचा बिबट्या व्हॉट्सअॅप पोस्टवरून सोलापुरात दाखल झाला. या दोन्ही व्हिडिओची सत्यता वन विभागाने पडताळली असून, हे व्हिडिओ सोलापुरातील नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, काळजी म्हणून सोरेगाव परिसरात कॅमेरा व पिंजरा लावण्यात आला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, केगावमध्ये सोमवारी तिथल्या रहिवाशांना बिबट्या भिंतीवर बसलेला दिसला होता. पंधरा दिवसांपूर्वी देखील बिबट्या आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तिथे तरस असू शकतो असेही म्हटले जात आहे. पण, तरस हा भिंतीवर चढू शकत नाही. त्यामुळे याबाबत सत्त्यता पडताळण्याची मागणी होत आहे त्यानंतर दोनच दिवसांत सोरेगाव परिसरात बिबट्या दिसल्याचा मेसेज सोशल मीडियावर वायरल झाला.
सोरेगाव भाटेवाडी परिसरातील उसाच्या फडात आणि भिंतीवर खरोखरच एखाद्या व्यक्तीला बिबट्या दिसला असेल संबंधित व्यक्तीने त्याची व्हिडिओ चित्तीकरण केले असल्यास वनविभाग किंवा प्रसारमाध्यमास त्या संबंधित व्यक्तीकडून माहिती का दिली नाही.? बिबट्या दिसलेल्या व्यक्तीकडून वस्तूनिष्ठ आणि खरोखर माहिती दिली गेल्यास बिबट्यापासून निर्माण होणाऱ्या धोका टाळू शकणार आहे. बिबट्या दिसलाच असेल तर माहिती द्यायला अडचण काय नसावी बिबटे दिसल्यास वनविभागाच्या हॅलो फॉरेस्ट 1926 या क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.