इन्शुरन्स असेल तर अपघातात नुकसान झाल्यास आर्थिक फटका बसणार नाही प्रत्येकाने इन्शुरन्स काढणे गरजेचे : ॲड.बाळासाहेब नवले
सोलापूर बार असोसिएशन तर्फे विधी व्याख्यानमाला पुष्प सातवे

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर बार असोसिएशनने वकिलांसाठी विधी व्याख्यानमालेची सुरुवात केली. व्याख्यानमालेचे सातवे पुष्प 17 ऑगस्ट 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ व मोटर एक्सीडेंट कायद्यातील निष्णात विधीज्ञ ॲड. बाळासाहेब नवले यांच्या हस्ते गुंफण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमास ॲड. एस. एस. पुजारी, ॲड. मल्लिकार्जुन पाटील, ॲड. निलेश जोशी, ॲड. डी. एन. मैंदरकर, ॲड. इंद्रजित पाटील, ॲड. अभय बिराजदार, ॲड. शिवानंद फताटे, ॲड. उमेश भोजने या ज्येष्ठ विधीज्ञांची प्रमुख उपस्थिती होती.
सातव्या पुष्पातील व्याख्यानाचा विषय “Practical approach towards motor accident claims” असा होता. प्रस्तुत व्याख्यानमालेचे उद्घाटन सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली व कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष ॲड. अमित आळंगे यांनी केली, वक्त्यांचा परिचय सहसचिवा उपाध्यक्ष-ॲड. व्ही. पी. शिंदे यांनी करून दिले.
ॲड. बाळासाहेब नवले यांनी सुरुवातीला दळण वळणाचे माध्यम म्हणून जास्त वाहने नव्हती. परंतु जसे वाहनांची संख्या वाढली तसे अपघातांची देखील संख्या वाढली. कालांतराने अपघाती जखमी अथवा मृत झालेल्या वर अवलंबून असणाऱ्या अवलंबितांना नुकसान भरपाई देणे गरजेचे झाल्याचे सांगून नुकसान भरपाई चे दावे दाखल करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल मार्गदर्शन केले. अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरला लायसन्स नसल्याची बाब इन्शुरन्स कंपनीने सिद्ध करावे लागते ही बाब देखील स्पष्ट करून सांगितले. काळ जसा बदलला तसे मोटर वेहिकल ऍक्ट मधील तरतुदी देखील बदलल्या गेल्या. सन 2022 पर्यंत नुकसान भरपाई क्लेम दाखल करण्यासाठी मुदत विहित केलेले नव्हते. परंतु त्यानंतर सहा महिन्यांच्या मुदतीची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. या कायद्यातील आवश्यक बाबी उदाहरणाद्वारे उलघडून सांगितल्या. नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्याचे पद्धत व आवश्यक बाबी काय आहेत यांचा देखील ओहापोह केला.
भारतात कायदा एकच असल्याने कर्नाटकात जावून याचीका दाखल करायची आवश्यकता नाही, नुकसान भरपाईवर काहीही परिणाम होणार नाही. याप्रसंगी विविध न्यायालयीन निवाड्यांचे उहापोह करून उत्कृष्ट मार्गदर्शन केले. उपस्थित वकिलांच्या विविध जटील प्रश्नांचा देखील अतिशय सोप्या भाषेत उत्तरे देऊन त्यांच्या शंका दूर केल्या.
सदर कार्यक्रमावेळी सोलापूर बार असो अध्यक्ष ॲड.अमित आळंगे, उपाध्यक्ष-ॲड. व्ही. पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज पामूल, सहसचिव ॲड. निदा सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे सह सोलापूर बार असोसिएशन बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव ॲड. मनोज पामुल व आभार खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे यांनी केले.