अखेर शहरातील दोन्ही उड्डाणपूल ची निविदा प्रसिद्ध, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाचा विषय रखडला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या दोन्ही उड्डाणपूलच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे लवकरच उड्डाण पुलाच्या कामाला आता सुरुवात होईल.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जुना पुना नाका ते पत्रकार भवन आणि जुना बोरमानी नाका ते पत्रकार भवन अशा दोन उड्डाणपूलची एकच निविदा प्रसिद्ध केली असून दोन्ही मिळून १२. ४९ किलोमीटर अंतर उड्डाणपुलाचे काम आहे. यासाठी १०९७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. निविदा भरण्यासाठी 18 सप्टेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.
निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर कागदपत्रांची छाननी करून निविदा निश्चित करण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागेल यानंतर मक्तेदारा सोबत करार करून वर्क ऑर्डर दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. दोन्ही उड्डाणपूल माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी सुचवले होते, मंजूर करून घेतले आणि त्याचा पाठपुरावा करून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.