सोलापुरात खोकलेआई मंदिराची अज्ञात समाज कटंका कडुन मोडतोड, मुर्तीला कोणताही धक्का लागला नाही, हिंदुमहासभा कडुन FIR दाखल

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले खोकलेआई देवीचे मंदिर हे नार्थकोट शाळेतील पाठीमागील भिंतीच्या लगत आहे होम मैदानाच्या समोरच्या बाजूस आहे. तेथे रात्री काही समाज कंटकाने देवीच्या मंदिरातील दरवाजा उचकटून टाकला आतील भिंतसुद्धा फोडण्याचा प्रत्यन केला घडलेली घटना सुधीर बहिरवाडे यांना सकाळी एकाने व्हिडिओ पाठवून माहिती कळवली. त्यावेळी त्यांनी लगेच भर पावसात तिथे जाऊन पाहणी केली तेथील पुजारीला शोधणाचा खुप प्रत्यन केला परंतु त्याचा पत्ता काहि मिळला नाही. आपले सहकारी प्रशांत पवार यांना बोलवून घेऊन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना माहिती कळवली.
श्री कबाडे यांनी लागलीचं सदर बाझार चे पोलीस निरीक्षक लकडे यांना कळवुन तेथे पोलीस फोर्स पाठवला पोलिसांनी सुद्धा एवढे सहकार्य केलं की लगेच तेथील स्वच्छ साफसफाई करून जसं पूर्वी दरवाजा होता व भिंत होती तशीच कारगीराना बोलवून जस होत तस उभा केलं. सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये सुधीर बहिरवाडे यांना घेऊन जाऊन FIR दाखल केले.
पोलिसांचे खूप सहकार्य लाभले.
समाजकंटकांचा काय उद्देश होता कळला नाही त्यांना जर चोरीच करायची होती तर ते जड दरवाजा घेऊन पळाले असते पण जर त्यांना हिंदु धर्माचे विरोधात काय करायचे असले तर मूर्तीची विटंबना केलं असती त्यांनी मुर्ती काहि सुध्दा केल नाहि परंतु हा काहीतरी वेगळाच संदेश त्यांना द्यायचा होता अजून काही समाजकंटक सुद्धा आपल्यात आहेत नास्तिक लोक सुद्धा आपल्यात आहेत.
त्यामुळे मंदिरातील पुजारी व ट्रस्टीने आपली खबरदारी घ्यावी व सावधानगी बाळगावी जिथे जिथे सीसीटीव्ही लावण्यात यावे आपल्या मंदिराची सुरक्षा घेणे खूप गरजेचे आहे. यावेळी पोलीस उपायुक्त कबाडे, पोलीस निरीक्षक लकडे, पोलीस उपनिरीक्षक ढवळे यांचे सहकार्य लाभले. अशी माहिती हिंदुमहासभा सोलापुर शहर अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिली.