Big News.. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिला राजीनामा

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार आपणा कडून माझी सोलापूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. या सहा महिन्याच्या कालावधीत मी पक्ष वाढीकरिता सर्व संभव प्रयत्न केले आहेत. मला आपण या पदावर काम करण्याची संधी दिला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आपल्या पक्षात मला अनेक लोकांनी सहकार्य केले मी त्यांच्याही आभार व्यक्त करतो. पण आता मी या पदावर काम करू शकत नाही म्हणून मी स्वेच्छेने या पदाचा राजीनामा देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा ही विनंती. असे म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आणि माहितीस्तव एक पत्र निरीक्षक शेखर माने माजी महापौर महेश कोठे यांना देखील दिले आहे.
एकंदरीतच सुधीर खरटमल यांनी राजीनामा का दिला.? या पाठीमागील कारणे कोणती आहेत.? त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार का.? यासह अनेक प्रश्नांचा उलगडा येणाऱ्या दिवसात होईलच.