समाजासह प्रभागासाठी झटणारा नेता म्हणजे समाजरत्न अजितभाऊ गायकवाड : आमदार विजयकुमार देशमुख
विविध सामाजिक उपक्रमांनी समाजरत्न अजित गायकवाड यांचा वाढदिवस मोठा उत्साहात साजरा करण्यात आला.

सोलापूर : प्रतिनिधी
बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि प्रभाग क्रमांक चारच्या वतीने 30 ऑक्टोबर समाजरत्न अजित गायकवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. रविवारी बॉबी चौक येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती अजित गायकवाड यांचा वाढदिवस केक कापून मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक संजय कोळी, राजाभाऊ काकडे, राजू पाटील, आरपीआयचे सुबोध वाघमोडे, के डी कांबळे, अरुण भालेराव, पुण्याचे उद्योगपती व गोल्डन मॅन नितीन गायकवाड, भिवंडी चे उद्योगपती व गोल्डन मॅन मनोज लोंढे, शिवम सोनकांबळे, सुशील सरवदे, अश्विन गायकवाड, महेश गजधाने, किशोर बाळ गायकवाड, सुधीर बीडबाग, अमोल धेंडे, शिवाजी थोरात, कपिल घोडके, विशाल कांबळे, गौतम कसबे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आपल्या समाजासह सर्वांसाठी झटणारा नेता म्हणजे खऱ्या अर्थाने समाजरत्न अजित गायकवाड हे असून त्यांनी आपल्या प्रभागात सर्वांगीण विकासासाठी निधी खेचून आणत अनेक कामे केली आहेत. अजित गायकवाड यांना उत्तम आरोग्य लाभो असे म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनेक मान्यवरांनी समाज रत्न अजित गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत अजित गायकवाड यांनी यापुढे देखील सामाजिक बांधिलकी जोपासत नव्या उत्साहाने नव्या जोमात कार्य करत राहू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त बॉबी ग्रुप मधील सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी प्रभाग क्रमांक 4 रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.