
सोलापूर : प्रतिनिधी
श्री गणेशोत्सवा निमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे श्रीदत्त चौक येथून उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर, ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता हिरवा झेंडा दाखवुन मॅरेथाॅन महाराष्ट्राचे राज्यगीतानंतर दौडला प्रारंभ करण्यात आला.
विकृत प्रवृत्तीच्या विरोधात मुलींना स्वालंब बनण्यासाठी Runs For Girls Safety चे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत तीनशे ते चारशे विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता मध्यवर्ती मंडळातर्फे घोषवाक्य लिहिलेले टी शर्ट देण्यात आले होते.
ही मॅरेथाॅन दौड दत्त चौक, राजवाडे चौक, नवी पेठ, गंगा विहिर, चौपाड, मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस, चाटी गल्ली, मंगळवार पेठ पोलीस चौकी, सराफ बाजार, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती दत्त चौक, सरस्वती मंदिर येथे सांगता करण्यात आली. तीन ते चार किलोमीटरचा टप्पा होता. या स्पर्धेसाठी पोलीस प्रशासन, मध्यवर्ती ट्रस्टी, उत्सव समिती पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेतील विजेत्यांना माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते मध्यवर्तीच्या माध्यमातून मेडल, प्रशस्तिपत्र देण्यात आले.
या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी माजी आमदार ट्रस्टी नरसिंग मेंगजी, उत्सव समिती अध्यक्ष विनायक महिंद्रकर, ट्रस्टी सुनिल रसाळे, श्रीशैल बनशेट्टी, उपाध्यक्ष विजय पुकाळे, सोमनाथ मेंडके तसेच माजी महापौर शोभाताई बनशेट्टी, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, लताताई फुटाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय शिंदे, गौरव जक्कापुरे यांनी मांडले. उत्सव उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम, उत्सव कार्यवाह आकाश हारकुड, संतोष खंडेराव, मल्लिनाथ सोलापूरे, आशिष उपाध्ये, विजयकुमार बिराजदार, विरेश सक्करगी, दिलीप पाटील, द्वारकप्रसाद तावनीया, अभिषेक रंपुरे, प्रसाद कुमठेकर, गिरीश शहाणे, प्रसिध्दीप्रमुख शिवानंद येरटे आदींची उपस्थिती होती.