ओकिनावा मार्शल आर्ट्स कराटे अकॅडमी सोलापूरच्या वतीने राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे आयोजन

सोलापूर : प्रतिनिधी
२९ सप्टेंबर २०२४ रोजी सोलापूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी ओकिनावा मार्शल आर्ट्स कराटे अकॅडमी सोलापूरच्या वतीने राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून अंदाजे ८०० ते ९०० विद्यार्थी उपस्थित राहतील. ओकिनावा मार्शल आर्ट्स इंटरनॅशनल बिनोरीओ स्टाईल चे ग्रँडमास्टर एस. श्रीनिवासन यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये त्याच बरोबर महाराष्ट्रातील राष्ट्रीय पंच यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धा विविध कलर बेल्ट तसेच विद्यार्थ्यांचे वय यानुसार घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने सुलो काता, कुमेते, वेपन काता, ग्रुप काता या प्रकारामध्ये घेण्यात येणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार सुवर्णपदक, रौप्य पदक व कांस्यपदक तसेच संघटनेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेचे उद्घाटन केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या इनडोअर हॉल या ठिकाणी ठीक सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर पद्माकर काळे, केदारनाथ उंबरजे, संतोष पवार, संजय नवले, क्रीडा मार्गदर्शक सत्यन जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर या स्पर्धा एक दिवशीय असल्याकारणाने सायंकाळी ६ वाजता पारितोषिक वितरण होईल. त्यानंतर स्पर्धेचा समारोप होईल. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेत स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष प्रभूराजेंद्र भिमदे, दशरथ काळे, शिवशरण वाणी परीट, मनीषा भिमदे, स्मिता वाणी परीट, सचिन स्वामी आदी उपस्थित होते.