
सोलापूर : प्रतिनिधी
रस्ता मागणी प्रकरणे, रेशन कार्ड दुबार, नाव कमी करणे व वाढविणे, सातबारा नोंदी दुरुस्ती, जन्म- मृत्यूच्या नोंदीची अनेक प्रकरणे पेंडिंग असल्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे उत्तर तहसीलदारांना अडचणीचे ठरले आहे. तसेच सोलापूर महानगरपालिका प्रशासनातील भोंगळ कारभार चाहवाट्यावर आला आहे. शहरातून आणि गावागावातून आलेल्या तक्रारींची बेदखल करणाऱ्या तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी तपासणी करणार आहेत. तसे पत्रच काढण्यात आले आहे. आमदार बच्चू भाऊ सोलापुरात येणार असल्यने प्रशासनाने धास्ती घेतली आहे. बच्चू कडूमुळे कुणाची विकेट पडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकी अगोदर तहसीलदारांना एखादे काम सांगितले किंवा तहसीलदारांना भेटतो असे कोणी म्हटले तर कर्मचारी काम मार्गी लावत होते. मात्र जयवंत पाटील यांच्या बदली नंतर उत्तर तहसील कार्यालयात ग्रामीण भागातून अथवा शहरातील कोणी काम घेऊन आले तर होत नाही. याबाबत अनेकांच्या तक्रारी प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. कामे होत नसल्याने प्रहार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
बच्चू कडू या विषयांवर अधिक लक्ष घालणार आहेत. पुनम गेट येथील आंदोलन स्थळ बदलून ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागा उपलब्ध करणेबाबत. दक्षिण सोलापूरातील अनेक गावात ग्रामसेवक दिव्यांगांचा निधी खर्च करत नाहीत, ग्रामसेवक थांबत नाही. उत्तर तहसील कार्यालयातील तहसील निलेश पाटील यांचेकडे १० हजार पेक्षा जास्त विविध प्रकारचे प्रकरणे प्रलंबित ठेऊन नागरिकांची पिळवणूक करित आहेत. पैसे देणाऱ्या एजंट व दलालांची कामे होतात पण सर्व सामान्य लोकांची कामे होत नाहीत. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या उर्दू मुलांची व मुलींची शाळा क्र.५ विजापूर वेस, रविवार पेठ शाळा क्र.५, तसेच जोडभावी पेठ चिरागअली शाळा या तिन्ही शाळांची अवस्था खराब म्हणजे अत्यंत दयनीय झालेली आहे. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मुलाणी जबाबदार आहे. तसेच त्यांचे बोलणे, वागणे लोकसेवकासारखे नसून चुकीच्या पध्दतीने लोकांशी बोलत असल्याने त्यांची चौकशी करून त्यांचेवर कारवाई करावी.
सोलापूरात मागील दोन महिन्यापूर्वी अवकाळी पावसाने अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, काही पंचनामे झाले, काहींचे पंचनामेही झाले नाही आणि एक रूपयांची नुकसान भरपाई भेटली नाही. लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना मिलच्या जागेत घरे बांधून देण्यात यावे. या संदर्भात महापालिकेने ठराव क्र.२८२ दि १० डिसेंबर २०१६ रोजी केला. पण सदरचा प्रस्ताव जाणूनबुजून शासनाकडे न पाठवता महापालिकेत ठेवलेला आहे. यासह विविध तक्रारी प्रहार संघटनेच्या वतीने आमदार बच्चू कडू यांच्याकडे दिले आहेत याचा सर्वाचा आढावा घेण्यासाठी आमदार बच्चू कडू सोलापुरात येणार असून याची चर्चा मात्र सोलापूर सर्व प्रशासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात रंगली आहे.
प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू सोलापुरात येणार असल्याने सोलापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. बच्चू कडू मुळे कुणाची विकेट पडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.