सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

देवेंद्र फडणवीस यांची भेट, दक्षिण सोलापूर मध्ये उमेदवार बदलासाठी सामूहिकरीत्या भेट ठरली आश्वासक

सोलापूर : प्रतिनिधी

लोकसभेनंतर खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीमध्ये रंगत आल्याचं पहावयास मिळते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चर्चिले जाणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून दक्षिण मतदारसंघाची ओळख निर्माण झाली आहे. येथे अनेक जण इच्छुक असून भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात भाजपच पक्षांमधील आजी माजी नगरसेवक पदाधिकारी यांनी एकजूट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांची भेट घेत सामूहिकरीत्या आपले म्हणणे मांडले.

माजी नगरसेवक श्रीनिवास करली, अशोक बिराजदार पाटील, श्रीनिवास बुरुड, वैभव हत्तुरे, राजश्री चव्हाण, अनिल चव्हाण, इच्छुक उमेदवार मळसिद्ध मुगळे, सचिन चव्हाण, श्रीशेल मामा हत्तुरे, आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सागर बंगला येथे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. फडणवीस साहेबांना निवेदन देण्यात आले पण रतन टाटा यांचे निधन झाल्यामुळे पुढच्या आठवड्याची भेटीची वेळ दिली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा मुंबई येथे आगमन झाल्याकारणाने आजची भेट रद्द करण्यात आली व पुढील आठवड्याची वेळ देण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर मध्ये उमेदवार बदलासाठी आम्ही सामूहिकरीत्या भेट घेतली आहे. सर्वजण पुढील आठवड्यात बैठक घेऊ असे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. अशी माहिती देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!