बाबा चर्चा तर होणारच, शहर मध्य उमेदवारी मागणीवेळी बाबांनी वेधले लक्ष

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरातील विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलन व सामाजिक कार्य युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास उर्फ बाबा करगुळे यांनी केले आहे यासंदर्भातील डिजिटल फलक शर्ट स्वरूपात परिधान करून त्यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभेची उमेदवारी मागणी केली यावेळी त्यांनी आपण केलेल्या कार्याची माहिती सांगताना म्हणाले..
नरेंद्र मोदी सोलापूर आले असता यांना काळे झेंडा दाखण्यात आले व पोलीसाकडून बेदम मारहाण करण्यात आले. सोलापूर शहरात हेलमेट सक्तीच्या विरोधात व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आंदोलन केले. पेट्रोल-डिझेल दरवाढविरोधात आंदोलन. सोलापूर महानगरपालिकेच्या नागरिकांच्या विकासाकरिता महानगरपालिका दंडवत घालून आंदोलन करण्यात आले. सोलापूर शहरात डेंग्युचे प्रमाण वाढल्यामुळे भाजप सरकारच्याविरोधात सो.म.पा.च्या आवारात फवारणी करण्यात आले.
आ. प्रणितीताई शिंदे यांना मंत्रीमंडळात घ्यावे म्हणून आंदोलन व युवक काँग्रेस सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देण्यात आले. सोलापूर शहरातील पार्क स्टेडियम येथे चिखलाचे प्रमाण वाढून दुरावस्था झाल्यामुळे सो.म.पा. भाजप सरकार विरोधात चिकलात किक्रेट खेळून निषेध करण्यात आले. सोलापूर शहरातील विविध रस्ते अत्यंत खड्डेमय झाल्यामुळे महापालिकेच्या विरोधात त्यांच्या खड्यात झाडे लावून आंदोलन केले.
कोरोनाच्या काळात प्रभाग क्र. १५ मध्ये १२०० कुटुंबांना धान्य व सॅनिटायझर वाटप करण्यात आले आहे.सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभागात युवक काँग्रेसच्या शाखांव्दारे हजारो कार्यकर्त्यांना संघटीत केले.
सिव्हिल हॉस्पीटलचे दर वाढवल्याबद्दल तत्कालीन पालकमंत्र्यांच्या गाडी समोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यासह अनेक सामाजिक सांस्कृतिक कामे केले असून शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मी प्रबळ दावेदार असून उमेदवारी मला मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे अंबादास उर्फ बाबा करगुळे यांनी काँग्रेस पक्षाकडे केली.