सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पवार-जाधव-बागवान यांची माहिती.. सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकास कामांसाठी अजित दादांनी दिला कोट्यावधींचा निधी

सोलापूर : प्रतिनिधी

जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचे संयुक्तिक पत्रकार परिषद 15 ऑक्टोंबर दुपारी एक वाजता पार पडली. ही पत्रकार परिषद उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये जिल्हा समन्वयक यशवंत माने यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. महायुतीच्या काळात विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा झालेला विकास, राज्याच्या सर्वांगीण विकाससाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोककल्याणकारी घेतलेले निर्णय आणि त्यातून साधलेला विकास, राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला मिळालेला लाडकी बहिणींचा उदंड प्रतिसाद यासह विविध योजनेची माहिती अजितदादांनी केलेले कार्य विचार मंजूर केलेल्या योजना याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी अजितदादांनी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक निधी दिला. दादांनी मंजूर केलेल्या योजना त्याचा लाभ राज्यातील कोट्यावधी लाभार्थ्यांना झाला. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय प्रत्येक जण विकास रत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचे विशेष कौतुक करतोय. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शहर मध्य मतदार संघातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संधी दिल्यास राष्ट्रवादीचे किसन जाधव व जुबेर बागवान इच्छुक उमेदवार आहेत या दोघांपैकी कुणालाही उमेदवारी मिळो एक संघाने आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकूही अशी विश्वासार्ह प्रतिक्रिया व्यक्त केले

उमेश पाटील यांनी कुठे जावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न मात्र आम्ही दादांचे कट्टर समर्थक यापूर्वी होतो आहोत राहू अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्यातील प्रत्येक लाभार्थी म्हणतोय “विकासाचा एकच वादा फक्त अजितदादा” अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली.

मौलाना आझाद महामंडळाच्या माध्यमातून अजित दादांनी अल्पसंख्याकांसाठी भरमसाठ असा निधी दिला आजही दादा अल्पसंख्याक विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत राज्यातील एकमेव नेता मुस्लिम प्रवर्गासाठी प्रेरणास्थान नेते आहेत अशी प्रतिक्रिया कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केली.

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिश कालखंडात तारेच्या कुंपणातून मुक्त केलेल्या सेटलमेंट भागातील कैकाडी समाज , पामलोर समाज, टकारी समाज व बंजारा समाज अंतर्गत श्री संत सेवालाल संस्कृतिक भवन या समाजाच्या कामांना दिलेले प्रत्येकी ५० लाख रुपये असे एकूण २ कोट रुपये निधी जिल्हा नियोजन समितीतून आणि इतर छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन बांधणे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज सांस्कृतिक भवन बांधणे, क्षत्रिय समाज मंदिर बांधणे , राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर बांधणे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे, गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधणे, आदी जांबमुनी महाराज मोची समाज मंदिर बांधणे, श्री बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन मंदिर बांधणे, पद्मशाली समाज सांस्कृतिक मंदिर भवन बांधणे, मुस्लिम समाज सांस्कृतिक भवन मंदिर बांधणे, ख्रिश्चन समाज सांस्कृतिक मंदिर भवन बांधणे, या कामांसाठी शासनामार्फत ७ कोटींचा निधी मंजूर केला असे एकूण ९ कोटींचा निधी समाज मंदिर व विकास कामांसाठी अजितदादांनी उपलब्ध करून दिला. दिलेल्या शब्द वेळेत पूर्ण करणारे लोकप्रिय नेते म्हणून अजितदादांची विशेष ओळख आहे. शहर मध्य मतदार संघातून मला व जुबेर बागवान आमच्या दोघांपैकी कुणालाही संधी मिळाल्यास आम्ही ती निवडणूक जिल्हा समन्वयक यशवंत माने, जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वात एक संघाने लढू व सर्वाधिक मताधिकांनी निवडून येऊ शहर मध्यवर राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकवू अशी प्रतिक्रिया प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. दादांचे कार्य हे विकास प्रेरित कार्य आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपणही अजितदादांच्या पाठीशी अशाच पद्धतीने उभे राहावे असे आवाहन केले.

या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महेश निकंबे, सुरेश तोडकरी, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, युवा प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश झाडबुके, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, सोशल मीडिया विभाग अध्यक्ष वैभव गंगणे , कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, संतोष गायकवाड माणिक कांबळे हुलगप्पा शासम यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!