सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
उद्धव ठाकरे यांनी बांधले शिवबंधन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूर : प्रतिनिधी
सांगोला विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत मातोश्री येथे प्रवेश केला.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास भेट देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आशीर्वाद घेतले. त्यावेळेस उपस्थित सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शिवसैनिक उपस्थित होते.
यावरून सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सोलापूर शहर जिल्ह्यात रंगली आहे.