देवेंद्र फडणवीस व ॲड मिलिंद थोबडे यांच्यात सकारात्मक चर्चा, शहर उत्तर मध्ये चर्चेला उधान

सोलापूर : प्रतिनिधी
ॲड मिलिंद थोबडे यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मागितली आहे. पक्ष निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल, असा त्यांना विश्वास आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली.
मध्यंतरी ॲड मिलिंद थोबाडे यांनी आपल्याला भाजप कडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढण्याचीही आपली तयारी असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, पंढरपूर- मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व सोलापूर शहर उत्तर या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. मोहोळ, माढा येथे राष्ट्रवादीचे तर सांगोल्यात शिवसेनेचा आणि शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसचा तर करमाळ्यात अपक्ष आमदार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना एकत्रितपणे लढली होती, पण आता शिवसेनेत दोन गट पडले असून फुटलेल्या राष्ट्रवादीचा एक गट देखील शिवसेना- भाजप महायुती सरकारसोबत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या जागा कोणाला मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सहा मतदारसंघात भाजपचे आमदार असल्याने उर्वरित पाच मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार, याचीही उत्सुकता आहे.
अशातच एडवोकेट मिलिंद खोबरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माध्यमांना दिली आहे यावरून उत्तर मध्ये चर्चेला उधाण आले आहे.