सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठान, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा
आरोग्य सेवक विश्वनाथ बदलापुरे, गोरक्षण सिद्राम चरकुपल्ली यांना शिवगौरव पुरस्काराने सन्मानित

सोलापूर : प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्मारक नवी पेठ येथे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, सुवर्ण गणपती यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी दरवर्षीप्रमाणे समाजातील चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांना शिवगौरव पुरस्कार देण्यात आला. ह्या पुरस्कार चे मानकरी आरोग्य सेवक विश्वनाथ तीपन्ना बदलापुरे, गोरक्षण सिद्राम कृष्णहरी चरकुपल्ली यांना देण्यात आला.
यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे श्रीकांत घाडगे, छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे अमोल शिंदे, राष्ट्रीय मराठा महासंघाचे दास शेळके, शिवसेनेचे शशिकांत बिराजदार, दत्ता माने, देवीदास चेळकर, हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे, सकल हिंदू समाजाचे अंबादास गोरंटला, माजी नगरसेवक विनोद भोसले, अंबादास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळेस प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, उत्सव अध्यक्ष अनिकेत पवार, उपाध्यक्ष हर्षल जाधव, हर्षद कुलकर्णी, आनिल जाधव, अमृत हवळे, योगेश सलगर, अमेय कळसकर, ऊमेश जंब्बागी, सारंग नाईकवाडी, निलेश सांळुके, रोहित भोसले, राहुल डांगे, आनमोल केकडे, यश पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.