संभाजी ब्रिगेड च्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त सुरेखा पांढरे यांना जिजाऊ गौरव पुरस्काराने केले सन्मानित

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या 427 व्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने सुरेखा पांढरे यांना राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रमाता जिजाऊ यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले व रयतेचे स्वराज्य निर्माण केले त्यांच्या कर्तुत्वाचा प्रेरणा घेऊन सुरेखा पांढरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करून आपल्या मुलाला सनी पांढरे यांना चांगले संस्कार करून उच्च शिक्षण देऊन केन्द्र शासनाच्या भाभा आणूभट्टी संशोधन प्रकल्पात 21 व्या वर्षी अभियंता केले. त्यामुळे संभाजी ब्रिगेड च्या वतीने या कर्तुत्वाचा गौरव करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, संभाजीराजे भोसले, शत्रुघन माने, मोनाली धुमाळ, महेश भंडारे, रमेश चव्हाण, सचिन वनमाने, पिंटू कोरे, शेखर चौगुले, राजनंदिनी धुमाळ, शेखर कंटेकर इत्यादी उपस्थित होते.