गोल्डन नगरसेविका श्रीदेवीताई फुलारे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद : सुशीलकुमार शिंदे
माजी नगरसेविका श्रीदेवीताई जॉन फुलारे यांचा नागरी सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी
माजी नगरसेविका श्रीदेवीताई जॉन फुलारे यांचा वाढदिवस जूना आर टी ओ ऑफिस येथील संपर्क कार्यालय येथे पार पड़ला. या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार प्रकाश यालगुलवार, दिलीप माने, धाराशिव जिल्ह्याचे माजी बांधकाम सभापति मुकुंद डोंगरे, कॉंग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी महापौर आरिफ शेख, सोलापुर सर्जिकल चे मालक सलाम शेख,मोची समाज अध्यक्ष देविंद्र भंडारे, करेप्पा जंगम, सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माजी नगरसेविका श्रीदेवीताई फुलारे आणि सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले, तुमच्या प्रत्येक कार्याला साठी तुमच्या पाठीमागे ठाम उभा आहे असा विश्वास देखील त्यांनी वाढदिवसा दिनी व्यक्त केला.
यावेळी नागनाथ कास्लोळकर, नागेश म्हेत्रे, कोनापुरे चाळ अध्यक्ष शिवराम जगले, माजी परिवहन सभापती बसवराज म्हेत्रे, रंगप्पा मारेड्डी, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, विनोद भोसले, अश्विनी भोसले, उद्योजक पप्पू मस्के, दीपक गाँधी, विनोद गाँधी, संजय गाँधी, रविंद्र मस्के, असबे साहेब, राजू मेहता, मछिंद्र लोकेकर, श्रीधर असादे, राहुल कांबळे, दिनेश बिराजदार, नागु म्हेत्रे, मल्लेश म्हेत्रे, विजय बावडेकर, शंकर म्यागेरी, आनंद भंडारे, अनोक मीनगे, जेश्वा बालगेरी, प्रकाश मींगे यांच्या सह विविध संघटना व् मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात अला.