माघ वारीतील चौथे गोल रिंगण सुस्ते येथे भक्तीमय वातावरणत संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर व जिल्ह्यातील माघवारीला जाणाऱ्या सर्व दिंडीचे एकत्रीकरण भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून करून प्रस्थान व रिंगण सोहळा सुरु केला आहे. माघ शुद्ध नवमीला 06 फेब्रुवारी 2025 मंगळवार रोजी दु . 5.00 वा. प्रदीप मोरे महाराज, दगडू डोंगरे यांचे हस्ते पालखी पूजन केले आहे. वारकरी प्रथे प्रमाणे नित्य नियमाचे अभंग व भजन केले जाणार आहे. त्यावेळी जे उपस्थित सर्व दिंडीतील विणेकरी महाराज व पदाधिकारी यांचा दिलीप घाडगे, अनिल घाडगे – ग्रामपंचायत सुस्ते यांचे कडून सन्मान करण्यात आला.
हा पालखी सोहळा “ज्ञानोबा तुकाराम” भजन करत श्री दत्त प्रशाला, सुस्ते येथे पोहोचला आणि नंतर मान्यवर व दिंडी प्रमुख यांचे हस्ते अश्व पूजन केले व मान्यवरांचा सन्मान करून तदनंतर गोल रिंगण लाऊन घेतले, पहिले रिंगण ध्वजाधारी केले कारण दिंडीची सुरुवात पताकाने होते. तुळशी वृंदावनधारी महिला व मृदंगाचे रिंगण झाल्या नंतर विणेकरी रिंगण केले.
शेवटी अश्व रिंगण सुरु झाले आणि भाविकांच्या मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यामध्ये 23 दिंडी सहभागी झाल्या होत्या हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो महिला व पुरुष भाविक उपस्थित होते. तसेच सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असून या सर्व कार्यक्रमासाठी जोतिराम चांगभले, तानाजी बेलेराव, सुरेश पोखरकर, गोरख शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, इ पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला. सर्व पदाधिकारीनी परिश्रम घेतले आहे.