४ पिस्टल व २४ काडतूस ३ आरोपी अटकेत आरोपींना मिळाली ५ दिवसाची पोलीस कोठडी

सोलापूर : प्रतिनिधी
यातील फिर्यादी प्रकाश सिध्देश्वर कारटकर नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांनी व सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल किसनराव वायकर, पोउपनि / रविराज सायबण्णा कांबळे, पोहेकॉ/1564 विरेश सुभाशबाबू कलशेट्टी, मपोहेकॉ/642 आश्विनी गणपत गोटे, पोकॉ/845 अजय पांडुरंग वाघमारे, पोकॉ/727 राहुल राम दोरकर, पोकों/454 हरिदास थोरात, चापोकों / डी-37 सुनिल पवार सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण पोलीस पथकासह मंगळवेढा उपविभागात गोपणीय बातमीची शाहनिशा करण्याकामी गेलो असता असताना पोहेकॉ/93 प्रकाश कारटकर यांनी सांगितले की, गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नाव फाईक मुस्ताक हा जंगलगी गावात राजकुमार बिराजदार यांच्या शेतात पत्राच्या शेडमध्ये वास्तव्यास असून तो देशी बनावटीचे पिस्टल व राउंड सोबत बाळगुन आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना मिळालेली बातमी सांगितली असता, त्यांनी तात्काळ पथकासह रवाना होवुन कारवाई करण्याचे मुखशील आदेश दिले. त्यानंतर तात्काळ पोहेकॉ/93 प्रकाश सिध्देश्वर कारटकर यांच्या मार्फतीने दोन इसमांना पंच म्हणून बोलावून घेवून त्यांना बातमीतील हकीकत सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर यांनी सांगितले असता, ते स्वखुशीने पंचनामा करण्याकरीता तयार झाल्यानंतर पोलीस स्टाफ व पंच असे पंचनाम्यासाठी लागणारे साहित्य लॅपटॉप, प्रिंटर व इतर साहित्य सोबत घेवुन सरकारी वाहन क्र. एमएच/13/ईसी/2310 व सरकारी वाहन आर.टी.ओ क्रमांक एमएच/13/डीएन/9440 असे कारवाई करीता मंगळवेढा पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण कडील दैनंदिनी क्रं नोंद क्र 21/2025 अन्वये छापा कारवाई करीता रवाना झालो. त्यानंतर माकड चैक मार्गे जंगलगी गावात प्रवेश करत असताना पुढे जावुन राजकुमार बिराजदार यांच्या शेतावर नमुद बातमीच्या ठिकाणी जावून पंच व पोलीस स्टाफ असे शासकीय वाहनातुन खाली उतरून पायी चालत त्यास लागलीच गराडा घालून बातमीतील नमूद वर्णना प्रमाणे इसम राजकुमार बिराजदार यांच्या शेतात पत्राच्या शेडमध्ये एका बाजूने उघड्या असलेल्या दरवाजाच्या दिशेने आत प्रवेश केला असता दोन इसम मिळुन आले.
त्याचे हालचाली वरून बातमी प्रमाणे संशय आल्याने त्यांना जागीच पकडले ती वेळ 14/48 वा ची होती. आम्हा पंचासमक्ष पकडलेल्या इसमांना नाव, पत्ता विचारता तो उडवाउडवीचे उत्तरे देवु लागले तेव्हा त्यांनी तुम्ही कोण असे विचारले असता आम्ही पोलीस असल्याचे सांगुन, पोलीस ओळखपत्र दाखवून त्यास नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव फाईक मुस्ताक कळमबैंकर वय, 46, रा. शिवाजी नगर, मिस्वी विला, मिल्लत नगर, रत्नागिरी असे असल्याचे सांगितले त्याचे सोबत असलेल्या इसमास त्याचे नाव, गाव पत्ता विचारले असता निगोंडा हणमंत बिराजदार वय. 37, रा. जंगलगी ता. मंगळवेढा जि. सोलापुर यांना त्यांचे अंगझडतीचा उद्देश समजावून सांगून पंचाची व पोलीसांची झडती घ्यावयाची आहे का? असे विचारता त्यास त्याने नकार दिला, त्यानंतर सपोनि विशाल वायकर यांनी उपस्थित पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने फाईक मुस्ताक कळमबैकर व निगोंडा हनुमंत बिराजदार यांची अंगझडती घेतली असता, फाईक मुस्ताक कळमबैंकर च्या कंबरेला डाव्या बाजूस पॅन्टीत खोचलेली एक देशी बनावटीची पिस्टल मॅगझीनसह व पॅन्टच्या उजव्या खिशातून 05 जिवंत काडतुसे व पॅन्टच्या डाव्या खिशामध्ये मोबाईल हॅन्डसेट मिळून आला. त्यानंतर त्यास शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का ? याबाबत विचारले असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितले. सदरचे देशी बनावटीचे पिस्टल हे मला निगोंडा बिराजदार यांने दिले असल्याचे सागिंतल्याने निगोंडा याच्याकडे अधिक चौकशी केली असता मी चार देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे उपलब्ध करून त्यापैकी ४ पिस्टल व २४ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली.
छापा कारवाई घटना स्थळाची चतुर्सिमा पाहता पूर्वेस गुरू बसु बिराजदार यांची शेती असून पश्चिमेस सोमनिंग भिमराय बिराजदार यांची उत्तरेस राजकुमार बिराजदार यांची शेती व दक्षिणेस माकड चैक ते भुयार जाणारा रोड येणे प्रमाणे चतुर्सिमा असे.
दिनांक 5/02/2025 रोजी बुधवारी आरोपी नाव फाईक मुस्ताक कळमबैकर वय ४६ रा.शिवाजी नगर मिस्त्री विला,मिल्लत नगर रत्नागिरी , निगोंडा हणमंत बिराजदार वय ३७ व राजकुमार हणमंत बिराजदार दोघे ही राहणार जंगलगी तालुका मंगळवेढा यांनी कोणत्याही प्रकारच्या अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना नसताना बेकायदेशीर पणे जवळ बाळगल्या प्रकरणी त्यांच्या विरुध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश कृष्णाराव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी सदस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकणी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश बिंबाळकर यांच्या मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक, विशाल वायकर, पोलीस उप-निरीक्षक रविराज कांबळे व पथकातील, पोहेकों/प्रकाश कारटक, विरेश कलशेट्टी, अश्विनी गोटे, पोकों/अजय वाघमारे, हरिश थोरात, राहुल दोरकर, वापोकों/ सुनिल पवार, पोकों/ अनवर अत्तार, बाळराजे घाडगे यांनी बजावली.