अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी शहरतील विविध पानंटपारीची केली पाहणी, पानंटपारी धारकांनी आपले परिसर स्वच्छ ठेवण्याचे दिल्या सूचना

सोलापूर : प्रतिनिधी
महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशान्वये गुटका व मावा सार्वजनिक भागात थुंकणारे नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी शहरातील विविध पानटपरी ठिकाणी पहाणी करून त्या पानटपरी धारकांना थुंकलेले ठिकाणी स्वच्छता करण्याचे सूचना देण्यात आले.
सोलापूर शहरातील पार्क चौक, फ़ॉरेस्ट, बुधवार पेठ, घरकुल, दहीटणे शेळगी, गांधी नगर, जुना घरकुल, मुळेगाव रोड, भवानी पेठ, एम. आय. डि. सी, नीलम नगर, जुना कुंभारी नाका, आसरा चौक, विजापूर रोड, सेटलमेंट, इंद्रभवन, दत्त नगर, सात रस्ता, मैलाली चौक अश्या विविध सार्वजनिक ठिकाणी थुंकल्या बाबत एकूण 44 व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून 6400/- इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आले.
सदर मोहिम मध्ये पालिका सहा आयुक्त भोसले सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार, अनिल चराटे, सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांच्यामार्फत करण्यात आले.