100 मुला मुलिंना अपरिचित सामाजिक संस्था व एचडीएफसी बॅंक यांच्या तर्फे शालेय साहित्याचे वाटप.

सोलापूर : प्रतिनिधी
अपरिचित सामाजिक संस्था व एचडिएफसी बॅंक अधिकारी, कर्मचाऱी यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप मुलांची मराठी शाळा क्रमांक 29 भवानी पेठ शाळेतील सर्व मुलांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य व खावुचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश धनवटे यांनी शाळेचा इतिहास सांगितला व आपण शाळेच्या सुरवातीला जे शैक्षणिक साहित्य देतात त्या मुळे गरिब गरजु विद्यार्थाना खुप मदत होते असे मत व्यक्त केले. सरस्वती पूजनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी एचडीएफसी सिटी हेड अंकुश अंबले, रुपेश दुधनी, अंकिता कमोनी, प्रीती कर्जल, प्रकाश पाटील, अनिरुद्ध पानसे, लक्ष्मण शिंदे, विकास इंगळे, अमोल धवलशांक, प्रमोद हिंगमिरे, किसन वाघमारे, तसेच अपरिचित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मयुर गवते यांनी बॅंक व जिल्हापरिषद शाळा म्हणजे ऐक अर्थ वाहिनी, दुसरी शैक्षणिक वाहिनी आहे अर्थ वाहिनीने गरजू गरिब कुटुंबांना जि मदत करतात त्या मुळे अनेकांचे भविष्य उज्ज्वल होते असे मत व्यक्त केले.
एचडीएफसी बॅंकेचे अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी शाळेतील जास्तीत जास्त मुलांना स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी आव्हान केले. त्यासाठी मुलांना येणारा खर्च कर्मचारी मिळून करू असा शब्द दिला त्यानंतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ माळी यांनी केले व आभार अविनाश हिंगणे यांनी मानले.