प्राचार्य डाॅ. वैशाली कडुकर यांनी योगाचे महत्त्व दिले पटवून, पोलीस प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय दिन उत्साहात साजरा

सोलापूर : प्रतिनिधी
पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापुर येथे २१ जून २०२४ रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.
त्या निमीत्त श्री. छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर सकाळी ६ः१५ ते ७ः३० यादरम्यान पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर प्राचार्य डाॅ. वैशाली कडुकर, उपप्राचार्य अनुराधा उदमले आंतरवर्ग व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी/अंमलदार, नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी सामूहिक योग सत्राचे आयोजित करण्यात आले होते.
सदर वेळी सौरभ बोत्रा, शासनमान्य योग प्रशिक्षक यांनी ऑनलाईन (डिजिटल माध्यमा द्वारे) योगाचे प्रशिक्षण दिले. सदर वेळी सूर्यनमस्कार, विविध आसने आणि श्वसनक्रिया यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
त्यानंतर प्राचार्य डाॅ. वैशाली कडुकर यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी/अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांना योगाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले.