
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने असे प्रकार सर्रास घडत होते. नराधमांनी अल्पवयीन पीडीतेचा वयाचा विचार न करता लैंगिक अत्याचार करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने समाज व्यवस्थेत बाब आणण्याचे काम हे नराधम समाजकंटक करत आहेत हे प्रमाण तात्काळ रोखण्यासाठी शहर व ग्रामीण स्तरावर विविध शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींच्या स्वसंरक्षणासाठी पूर्व प्रशिक्षित कराटे क्लासेस चालू करावेत या मागणीचे निवेदन महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी केली होती.
याची दखल घेऊन अजित पवार यांनी बुधवारी बारामतीत शक्ती बॉक्स तक्रारपेटी संकल्पना याची घोषणा केली. व ती अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू करण्यात आली असून राज्यातील महिला भगिनी मुलींनी आपली तक्रार या शक्ती बॉक्स तक्रार पेटी द्यावी नक्कीच शक्ती बॉक्स तक्रार पेटी त असलेल्या तक्रारींची दखल घेऊन तक्रारींचे निराकरण करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांच्या निवेदनाची अजितदादांनी तात्काळ दखल घेतल्याने राज्यातील महिला भगिनी व मुलींनी दादांच्या निर्णयाचे व वैभव गंगणे यांच्या पाठपुराव्याचे स्वागत केले, आभार प्रकट केले.