पोलीस संतोष पापडे यांची गुप्त माहिती आली कामी, अवघ्या तीन तासात अल्पवयीन बालिकेची सुटका

सोलापूर : प्रतिनिधी
११ ऑक्टोंबर २०२४ रोजी सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर गु. र. नं. ७७४/२०२४ BNS १३७ (२), ७८ सह पोस्को कलम १२ प्रमाणे रात्री ०२:१४ वाजता गुन्हा नोंद झाला होता. सदर पोलीस ठाणे हद्दीतील पीडित बालिका १४ वर्षे ३ महिने हिचे सोबत दोन महिन्यापासून लग्न लावून द्या म्हुणुन जय दीपक बोकेवाले मागे लागला होता. व सारखा तिचा पाठलाग करत होता.
सदर पडीतेचे वडील हे आरोपी यास पिढीतेस बोलू देत नसल्याने आरोपीने सदर पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन पीडित मुलीच्या वडिलांशी वाद घातला. व पीडित मुलीला जबरदस्तीने रात्री 10:30 च्या सुमारास पळून नेले. पीडित मुलींच्या घरच्या लोकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. त्यांनी सदर बाजार पोलीस ठाणे येथे येऊन पोलीसांना हकीकत सांगितली.
पीडित महिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे, महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध कठोर पावले उचलणे तसेच बदलापूर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आधीच आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने तात्काळ हद्दीतील सर्व पोलीस अधिकारी व पेट्रोलिंग करणारे कर्मचारी, मोबाईल तसेच सदर बझार डीबी पथकाला सदर पीडितेचा व आरोपीचा शोध घेणे कामी आदेश देण्यात आले.
सदर आदेशाच्या अनुषंगाने सदर बझार पोलीस स्टेशनचे वॉरंट अंमलदार पोलीस हवालदार संतोष पापडे यांनी गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढून सोबत पोलीस कॉन्टेबल १११९/उमेश चव्हाण यांना सोबतीला घेऊन घटना घडल्यापासून अवघ्या तीन तासात अल्पवयीन बालिकेचे अपहरण करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद केले व आरोपीच्या ताब्यातून पीडित बालिकेची सुटका केली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये तसेच पोलीस उपायुक्त कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गावरी, सदर बजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, दुय्यम पोलीस निरीक्षक ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष पापडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण यांनी पार पाडली.