सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“अभी नही तो कभी नही, मोहोल बदलने वाला है”, असे म्हणत शहर मध्य मुस्लिम समाजाच्या वतीने केली उमेदवारीची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे त्यातच शहर मध्य मधील मुस्लिम समाज एकत्र येत उमेदवारी मिळावी अशी मागणी सर्वांनी केली यावेळी माजी महापौर आरिफ शेख, तोफिक शेख पैलवान, रियाझ हुंडेकरी, शोकत पठाण, अजमल शेख, कोमारो सय्यद, नुरुद्दिन मुल्ला आदी उपस्थित होते.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी यासाठी विधानसभा अस्तित्वात आल्यापासून काँग्रेस पक्षाकडे समाजाने व काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मागणी करत आलेले आहेत. पण एकदाही मुस्लिम समाजाच्या उमेदवारास या मतदारसंघांमध्ये निवडणुकीत संधी देण्यात आलेली नाही. २००९, २०१४, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेसच्या विद्यमान खा. प्रणितीताई शिंदे यांनी विजय प्राप्त केलेला आहे. कृतिशील नेतृत्व असलेल्या प्रणितीताई शिंदे यांच्यामुळे तीन निवडणुकीत मतदारसंघावर आपला दावा न सांगता कॉग्रेसचे मुस्लिम कार्यकर्ते व मतदार प्रणितीताई सोबत राहिलेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मुस्लिम समाजाने काँग्रेसला भरघोस मते दिलेली आहेत. बुथनिहाय मतदाराचे अवलोकन केले असता त्याची प्रचिती येईल. पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून आजपर्यंत दोन-तीन अपवाद वगळता सदर मतदारसंघात काँग्रेसने यश मिळवले आहे. गेल्या दोन निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. आडम मास्तर यांची डिपॉझिट सुद्धा शाबित राहिलेली नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सदर मतदारसंघ महाविकास आघाडीच्या नावावर इतर पक्षाला देऊ नये अशी सर्वांची मागणी आहे.

वास्तविक पाहता या मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाज संख्येने इतर समाजापेक्षा जास्त आहे. त्यानंतर पद्मशाली, मोची व भटक्या-विमुक्त जमातीचे प्राबल्य आहे. या सर्व जाती जमातींच्या तुलनेत मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय आहे. एकूण ३,३९,६०८ मतदार असून त्यापैकी मुस्लिम मतदारांची संख्या किमान १,०३,००० आहे. सोलापूर जिल्ह्यात मुस्लिमांचे मतदान एकतर्फी झाल्यास महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवाराला याचा फायदा होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने हे सिद्ध केले आहे. या बाबीचा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने विचार करून जिल्ह्यात सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देणे अत्यावश्यक आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात किमान ११ मुस्लिमांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यापैकी एक शिक्षित मुस्लिम महिला आहे. सोलापूर जिल्ह्यात एकही मुस्लिम समाजाच्या महीला व पुरुषांस उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेत मुस्लिम समाजातील उमेदवारास शहर मध्यमध्ये उमेदवारी दिल्यास खंबीरपणे त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून निवडणूक आणण्यात येणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या सर्व मतदारसंघांमध्ये या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून जिल्ह्याच्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवाराला याचा फायदा होईल. जिल्ह्यात एकही मतदारसंघांमध्ये उमेदवारी न दिल्यास जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरेल आणि समाज महाविकास आघाडीच्या विरोधात जाईल, असे सर्वेक्षण आहे. या बाबीचा महायुतीने विचार करून श्रेष्ठींकडे याबाबत अहवाल पाठवावा.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याच्या तिन्ही मतदारसंघात मुस्लिम समाजाचे काँग्रेससह महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले आहे. राज्यात एकाही मतदारसंघांमध्ये लोकसभेत महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली नव्हती. असे असतानाही धर्मनिरपेक्ष विचारधारा व संविधानाच्या रक्षणासाठी राज्यातील मुस्लिमांनी प्रचंड संख्येने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिले आहे. लोकसभा निवडणुकीत त्याग आणि समर्पण केलेल्या मुस्लिम समाजाला विधानसभेत योग्य वाटा मिळणे हा त्याचा हक्क आणि अधिकार आहे.

सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेमध्ये मुस्लिम समाजाचा हिस्सा दिवसें-दिवस कमी होत चाललेला आहे. लोकशाही व धर्मनिरपेक्ष विचारसरणी स्वीकारलेल्या पक्षाने वंचित असलेल्या मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी योग्य प्रतिनिधित्व देणे अत्यावश्यक आहे. अशी मागणी पत्रकार परिषदेत सर्वांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!