सोलापूर “ब” संघाने पटकावला सोलापूर बार चषक २०२४, एकूण २० संघांचा सहभाग, बार्शी वकील संघ ठरला उपविजेता

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर बार असोसिएशन वार्षिक स्नेहसंमेलन 2024 निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वकिलांच्या सोलापूर बार प्रीमियर लीग मधील अंतिम सामन्यात सोलापूर ब संघाने सोलापूर बार चषक पटकावला. या स्पर्धेत एक न्यायाधीश संघासह एकूण 20 वकिलांच्या संघांचा समावेश होता.
सोलापूर शहर मुख्यालय आणि ग्रामीण मुख्यालय या दोन्ही मैदानावर साखळी सामने तीन दिवस चालले आणि उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने मुख्यालय शहर मैदानावर २९ डिसेंबर रोजी पार पाडले.
अंतिम सामना सोलापूर ब संघ आणि बार्शी वकील संघ यांच्यात झाला. अंतिम सामन्यात सोलापूर व संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व या संघाने 105 धावा केल्या. शिवकुमार वाले यांनी सर्वाधिक 21 चेंडूमध्ये 49 धावा काढल्या. स्वप्निल पुंजाल व शिव वाले यांनी 43 धावांची उत्तम भागीदारी केली. प्रत्युत्तरात बार्शी वकील संघाने अडखळत सुरुवात केली आणि एका नंतर एक विकेट गमावल्या.
कै. ॲड. व्ही. डी. फताटे यांच्या स्मरणार्थ ॲड. विक्रांत फताटे यांच्या सौजन्याने विजेता पुरस्कार सोलापूर ब संघास आणि उपविजेता पुरस्कार बार्शी वकील संघास प्रमुख पाहुणे सोलापूरचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी महाअधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोनी यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
अंतिम सामन्याचा सामनावीर आणि स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर ॲड. शिवकुमार वाले ठरला. उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार बार्शी वकील संघाचे ॲड. योगेश सावळे यांना मिळाला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी महाअधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोनी आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सोलापूरचे सुपुत्र ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश श्री गणेश पवार साहेब, सोलापूरचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री. नागरगोजे साहेब आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. कंकरे साहेब हे उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभाची सुरुवातीस सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची परंपरा जुनी असल्याचे सांगून दरवर्षी अशाच प्रकारे विविध कला गुणदर्शन आणि खेळांचे स्पर्धा भरविले जाणे वकिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे सांगितले व या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुके आणि सोलापूर शहरातून एकूण वीस वकिलांच्या क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवून अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सर्व सामने सर्व विधीज्ञ मंडळाच्या सहकार्याने उत्तमरीत्या पार पाडल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे ॲड. आशुतोष कुंभकोनी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात क्रिकेट स्पर्धेच्या उपक्रमाचे आणि एकंदरीत वकिलांच्या हिताच्या कार्यक्रमाचे कौतुक करून वकिलांना त्यांच्या कामामुळे उद्भवणाऱ्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी खेळ हे एकमेव माध्यम असल्याचे सांगितले. तसेच सोलापूर बार असोसिएशन मध्ये वकिली करीत असताना झालेल्या वकील आणि न्यायाधीश मंडळीच्या क्रिकेट सामन्याचे देखील आठवणी सांगितल्या आणि न्यायालयातील देखील विविध किस्से व आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर साहेबांनी त्यांच्या अध्यक्षिय भाषणात वकिलांसारख्या असोसिएशन मध्ये देखील त्यांच्या व्यस्त जीवनात अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याने सोलापूर बार असोसिएशनचे कौतुक केले आणि विजेत्या व उपविजेत्या संघाला शुभेच्छा दिल्या. तसेच वकील, न्यायाधीश आणि पोलिसांच्या दरम्यान क्रिकेटचे सामने व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.
सदर कार्यक्रमात विजेत्या संघाचे कर्णधार ॲड. विक्रांत फताटे आणि उपविजेत्या संघाचे कर्णधार ॲड. विशाल गोणेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून सोलापूर बार असोसिएशनचे आभार देखील मानले.
या बक्षीस वितरणाच्या समारंभात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. एस. आळंगे, ॲड. रोहिदास पवार आणि ॲड. झुलेका पिरजादे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
सदर संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ॲड. शिरीष जगताप, ॲड. निशिकांत देगावकर, ॲड. शुभम माने, ॲड. प्रकाश सोनार, ॲड. योगेश कुर्रे, ॲड. इरेश स्वामी, ॲड. स्वप्निल पुंजाल, ॲड. तुषार पामुल,ॲड. बालराज कैरमकोंडा, ॲड. बशीर शेख, ॲड. अमर जिंदम, ॲड. संतोष पुजारी, ॲड. सिद्धाराम पाटील, ॲड. बसवराज बळूर्गे, ॲड. प्रवीण ननवरे, ॲड. अविनाश खरटमल, ॲड. नाना द्वारकेश, ॲड. सौरभ जगताप, ॲड. दिलीप जगताप, ॲड. राहुल गायकवाड, ॲड. श्रीनिवास बंडी, ॲड. राकेश कोंपेल्ली, ॲड. रोहन सोमा, ॲड. संदीप शेंडगे आधी युवा विधिज्ञांनी भरपूर परिश्रम घेतले. तसेच स्पर्धेसाठी गोकुळ शुगर फॅक्टरीचे चेअरमन कपिल शिंदे, कोठारी पाईपचे श्री. पुष्कराज कोठारी, चडचणकर ट्रॅव्हल्स चे श्री. जगदीश चडचणकर, ॲड. संतोष न्हावकर आणि ॲड. सौरभ जगताप यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमावेळी सोलापूर बार असो अध्यक्ष ॲड. अमित व्हि. आळंगे, उपाध्यक्ष-ॲड. व्ही. पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज नागेश पामूल, सहसचिवा ॲड. निदा अनिस सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार सि. कटारे सह सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठविधीज्ञ ॲड. बाळासाहेब नवले, ॲड. रोहिदास पवार,ॲड. मल्लिनाथ पाटील, ॲड. श्रीनिवास क्यातम, ॲड. राजेंद्र फताटे, ॲड. लक्ष्मण मारडकर, ॲड. विद्यावंत पांढरे, ॲड. व्यंकटेश गुंडेली, ॲड. शिवानंद फताटे, ॲड. एस. एस. पुजारी, ॲड. अजय रणशृंगारे, ॲड. रविराज सरवदे, ॲड. राजशेखर आळंगे, ॲड. विनोदकुमार दरगड, ॲड. सार्थक चिवरी, ॲड. स्मिता आळंगे, ॲड. सरोजिनी तमशेट्टी आणि ॲड. मेघना मलपेद्दी बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲड. मनोज पामुल व आभार प्रदर्शन ॲड. विनयकुमार कटारे यांनी मानले.